Friday, 11 November 2016









शेजवान स्वास

वाढणी : साधारण अर्धा कप

हा शेजवान सॉस चायनिज स्टर फ्राईड वेजिटेबल्स बरोबर सर्व्ह करावा तसेच इतर चायनिज पदार्थातही याचा वापर करता येतो.


साहित्य:
१ टिस्पून आले पेस्ट
२ टिस्पून चिरलेले लसूण
२ टेस्पून पाती कांदा
१ टेस्पून पाती कांद्याची पाती
१ टेस्पून चिरलेली कोथिंबीर
१ टेस्पून चुरडलेल्या लाल मिरच्या
दिड टेस्पून लाल तिखट
१/३ कप टोमॅटो प्युरी
१ टेस्पून सोया सॉस
दिड टेस्पून व्हिनेगर
२ टेस्पून तेल
१ टिस्पून कॉर्न फ्लोअर
१/४ टिस्पून साखर
१/४ टिस्पून मिरपूड
चवीनुसार मिठ

शेजवान सॉस याही पद्धतीने करता येईल -

कृती:
१) कढईत तेल गरम करावे. त्यात आले लसूण फोडणीस घालावे, थोडा रंग बदलला पाती कांदा, कोथिंबीर आणि चुरडलेल्या लाल मिरचीची पूड घालून मिक्स करावे. १ ते २ मिनीटे परतावे.
२) नंतर लाल तिखट, टोमॅटो प्युरी, सोया सॉस, व्हिनेगर घालून निट मिक्स करावे. साखर, मिरपूड आणि मिठ घालावे. सर्व एकत्र ढवळून घ्यावे.
३) १ टिस्पून कॉर्न फ्लोअरमध्ये २ टेस्पून पाणी घालावे आणि मिक्स करावे. हे मिश्रण सॉसमध्ये घालावे व ढवळून मध्यम आचेवर १-२ मिनीटे उकळू द्यावे.
सॉस दाटसर झाला कि गॅसवरून उतरवावा. वरून चिरलेल्या पाती घालून मिक्स करावे.

टीप:
१) हा सॉस खुप तिखट असतो त्यामुळे वापरताना गरजेपुरताच वापरावा किंवा लाल तिखटाचे प्रमाण कमी करावे.
२) उरलेला शेजवान सॉस लहान डब्यात भरून फ्रिजमध्ये ६-७ दिवस सहज टिकतो.

वांग्याचा भात
वेळ: २५-३० मिनिटे
वाढणी: ३-४ जणांसाठी




साहित्य:
१ कप तांदूळ (बासमती किंवा तुकडा बासमती चालेल)
७-८ लहान वांगी (साधारण १/४ किलो), मोठ्या फोडी कराव्यात
फोडणीसाठी:- २ टेस्पून तेल, १/४ टिस्पून मोहोरी, १/८ टिस्पून हिंग, १/४ टिस्पून हळद, ७-८ पानं कढीपत्ता
१ टेस्पून 
चवीपुरते मीठ
वांगी तळण्यासाठी तेल
१ तमालपत्र आणि १-२ वेलची

कृती:
१) तांदूळ पाण्यात १५-२० मिनिटे भिजत घालावा. पाणी काढून टाकावे. भात मोकळा आणि जरा फडफडीत शिजवावा. शिजवताना त्यात मीठ, तमालपत्र आणि वेलची घालावी. भात शिजल्यावर तमालपत्र आणि वेलची काढून टाकावी.
२) कढईत तेल गरम करून त्यात वांगी तळून घ्यावी. (खाली टीप पहा)
३) मोठ्या जाड बुडाच्या कढईत २-३ टेस्पून तेल गरम करावे. त्यात मोहोरी, हिंग, हळद, कढीपत्ता घालून फोडणी करावी. त्यात तळलेली वांगी, थोडे मीठ आणि वांगीभात मसाला घालावा. लगेच भात घालून मिक्स करावे. जर कोरडे कोरडे वाटले तर थोडेसे तूप घालावे. चव पाहून लागल्यास मसाला किंवा मीठ घालावे.
मंद आचेवर मिक्स करावे. कढईवर जड झाकण ठेवून वाफ काढावी. तळाला भात चिकटणार नाही याची काळजी घ्यावी.
भात गरमच सर्व्ह करावा.

टीप:
१) तळण्यासाठी तेल कमीच घ्यावे आणि वांगी ३-४ बॅचमध्ये तळावी. जे उरलेले तेल असेल तेच फोडणीसाठी वापरावे म्हणजे तळणीचे पुढे काय करावे हा प्रश्न उरत नाही.
चकली





वेळ: ३० मिनिटे
१५ मध्यम चकल्या


साहित्य:
१ कप ज्वारीचे पीठ
१ टिस्पून मैदा
१/२ टिस्पून तीळ
१/२ टिस्पून जीरे, अर्धवट कुटलेले
१/४ टिस्पून ओवा
१ टिस्पून लाल तिखट
१/४ टिस्पून हिंग
साधारण १/२ कप पाणी
१/२ टिस्पून मीठ
चकल्या तळण्यासाठी तेल

कृती:
१) ज्वारीचे पीठ मोठ्या सुती रुमालात बांधून पुरचुंडी बनवावी. कुकरमध्ये तळाला १ इंच पाणी घालावे. त्यात भोकाची ताटली ठेवावी. त्यावर कुकरच्या आतील डबा ठेवून त्यात पिठाची पुरचुंडी ठेवावी.
२) कुकरच्या ३-४ शिट्ट्या होवू द्याव्यात. गॅस बंद करावा. कुकरचे प्रेशर कमी झाले कि कुकर उघडून पुरचुंडी काढावी. त्यातील पीठ जरा घट्ट झाले असेल.
३) हाताने गुठळ्या फोडून चाळून घ्यावे. त्यात मैदा, तीळ, जीरे, ओवा, लाल तिखट, हिंग आणि मीठ घालून मिक्स करावे. थोडे थोडे पाणी घालत मध्यमसर मळावे. चव पाहून लागल्यास मीठ घालावे. खूप घट्ट किंवा खूप सैलसुद्धा नको.
४) चकली यंत्राला आतून तेलाचा हात लावावा. चकलीची चकती बसवून साच्यात पीठ भरावे. कढईत तेल गरम करून आच मध्यम करावी. चकल्या पाडून बदामी रंगावर तळाव्यात.
तळलेल्या चकल्या कागदावर काढून गार होवू द्याव्यात. नंतर हवाबंद डब्यात भरून ठेवाव्यात.

टीपा:
१) ज्वारीच्या पिठाला चिकटपणा कमी असतो म्हणून चकल्या पाडताना त्या तुटण्याची शक्यता असते. म्हणून पीठ थोडे घट्ट वाटले तर पिठाला थोडा पाण्याचा हात लावून मळावे.
२) चकलीची जाड भोकाची चकती घ्यावी. बारीक भोकाच्या चकतीमुळे चकल्या पडतानाच तुटतात.

    करंजा



महत्त्वाच्या स्टेप्सचे फोटो पाककृतीच्या तळाला पाहायला मिळतील.

वेळ: ५० मिनिटे 
८  ते १० मध्यम करंज्या

साहित्य:
कव्हर-
१/२ कप मैदा
२ टेस्पून रवा
२ टेस्पून तूप, मोहनासाठी
चिमुटभर मीठ
खायचा रंग (लाल किंवा हिरवा)
२ ते ४ टेस्पून दुध
सारण-
१/२ कप किसलेले सुके खोबरे, भाजलेले
१/४ कप पिठी साखर
२ टेस्पून बारीक चिरलेले बदाम, पिस्ते, चारोळ्या
१/२ टीस्पून वेलची पूड
साटा-
३ टेस्पून तूप
२ टेस्पून कॉर्न फ्लोअर
इतर साहित्य-
तळण्यासाठी तूप

कृती:
१) मैदा आणि रवा एकत्र करून २ टेस्पून कडकडीत गरम तुपाचे मोहन घालावे. चमच्याने ढवळून मीठ घालावे. दुध घालून मध्यमसर मळून घ्यावे. २० मिनिटे झाकून ठेवावे.
२) तोवर सारण बनवावे. भाजलेले खोबरे हाताने चुरून घ्यावे. त्यात पिठीसाखर, बदाम-पिस्ते, आणि वेलचीपूड घालून मिक्स करावे.
३) तूप हाताने फेसून घ्यावे. तूप हलके झाले कि कॉर्न फ्लोअर एकत्र करून फेसावे.
४) भिजवलेले पीठ दोन समान भागात विभागून घ्यावे. एका भागात २-३ थेंब रंग घालून मळून घ्यावे.
५) पांढऱ्या रंगाचा गोळा घेउन एकदम पातळ लाटून घ्यावे. त्यावर बोटाने खळगे करून घ्यावे. त्यावर फेसलेला साटा लावावा.
६) रंगीत गोळ्याची पातळ पोळी लाटून घ्यावी. हि पोळी पहिल्या पोळीवर ठेवावी. त्यावर बोटाने खळगे करून घ्यावे. यावर साटा लावावा. घट्ट रोल करावा. थोडावेळ हा रोल हवेवर ठेवावा. साट्यातील तूप सुकले कि रोल थोडा घट्ट होईल.
७) रोल घट्टसर झाला कि त्याचे १ इंचाचे तुकडे करावे. लेयर असलेली बाजू वर ठेवून पुरी एवढे लाटावे. त्यात एक-दीड चमचा सारण भरून कडा सील कराव्यात. कातणाने जास्तीची कड कापून घ्यावी.
८) कढईत तूप गरम करून करंज्या मध्यम आचेवर तळून घ्याव्यात.

टीपा:
१) साटा तूपाऐवजी डालडाचा बनवला तरीही चालेल.
२) दोनऐवजी ३ पोळ्या सुद्धा करू शकतो.
३) रंग थोडे ठळक घ्यावे. जसे लाल, हिरवा. माझ्याकडे केशरी रंग होता. पण तो तळल्यावर खूप उठावदार दिसत नव्हता.
४) जर वातावरण उष्ण असेल तर तयार रोल १५ एक मिनिटे फ्रीजमध्ये ठेवावा. म्हणजे आतील साट्याचे तूप लवकर गोठेल.
५) मोहन कडकडीत गरम पाहिजे नाहीतर करंज्या नरम पडतील.
६) ५० करंज्या करण्यासाठी अडीच ते ३ कप मैदा, ५ ते ६ टेस्पून रवा आणि ५ टेस्पून तुपाचे मोहन घालून पीठ भिजवावे. सारणसुद्धा दिलेल्या प्रमाणाच्या अडीचपट बनवावे.

महत्त्वाच्या स्टेप्सचे फोटो.




    चकली 


वेळ: १ ते दिड तास
२०-२२ मध्यम चंपाकळ्या


साहित्य:
१०० ग्राम मैदा
१५ ग्राम वनस्पती तूप
चिमटीभर मीठ
पिठी साखर, गरजेनुसार
तेल किंवा तूप तळण्यासाठी

खालील फोटोवर क्लिक करा.


कृती:
१) मैद्यामध्ये मीठ आणि वनस्पती तूप घालावे. मैद्याला वनस्पती तूप चोळून लावावे. तूप सर्व मैद्याला व्यवस्थित लागले पाहिजे. थोडे पाणी घालून नेहमीच्या कणकेपेक्षा थोडे घट्ट मळून घ्यावे. १५-२० मिनिटे झाकून ठेवावे.
२) मळलेल्या पीठाचे साधारण १ इंचाचे गोळे करावे. प्रत्येकाची पातळ पुरी लाटावी. पुरीला उभ्या चिरा पाडाव्यात, पण कडा कापल्या जाणार नाहीत याची काळजी घ्यावी. चिरा शक्य तेवढ्या जवळजवळ असाव्यात म्हणजे चंपाकळी नाजूक बनतात. (वरील फोटो पहा)
३) चिरा पाडून झाल्यावर पहिल्या चीरेपासून रोल करत जावे. शेवटची टोके सील करत न्यावी. अशाप्रकारे आकाश कंदिलाप्रमाणे आकार येईल.
४) चंपाकळ्या तेलात मंद आचेवर तळाव्यात. कोमट झाल्या की पिठीसाखर भुरभुरावी.