विज्ञान आश्रम
प्रकल्प अहवाल
कौर्से :- डिप्लोमा इन
बेसिक रुरल टेक्नोलॉजी ( dbrt )
विभागाचे नाव :- गृह व
आरोग्य
विद्यार्थ्याचे नाव :-
स्वामी कचरे , साईराज चोळके
प्रकल्पाचे नाव :- उडीद
पापड बनवणे
प्रकल्प सुरु करण्याची
तारीख :- १६-५ -२०१७
प्रकल्प संपण्याची तारीख :-
१६-५-२०१७
विभाग प्रमख
प्राचार्य
|
अनु.क्रम
|
तपशील
|
|
१
|
प्रस्तावना
|
|
२
|
उद्देश
|
|
३
|
साहित्य / साधने
|
|
४
|
अंदाजपत्रक
|
|
५
|
कृती
|
|
६
|
प्रत्यक्ष खर्च
|
|
७
|
निरीक्षण
|
|
८
|
अनुभव
|
|
९
|
अनुमान
|
|
१०
|
फोटो
|
प्रस्तावना
तात्विक शिक्षणाबरोबरच
व्यावहारिक व व्यावसायिक जगाशी परिचय होतो व भावी जीवनाशी तोंड ओळख होते .
नैसर्गिक कल आणि आवड यांना योग्य त्या प्रोत्साहनाची जोड देणे आवश्यक आहे .
गृह व आरोग्याचे महत्व जाणून या
प्रकल्पातून आम्ही पापड तयार करीत आहोत .ज्यामुळे
कृतियुक्त अध्ययनाचे महत्व
समजते . बदलत्या काळाच्या गरजा लक्ष्यात घेऊन सस्तात मस्त या पूर्ण विचाराने आम्ही
हा प्रकल्प सदर करीत आहोत .
उदेश
पापड तयार करणे
साहित्य व साधने
१ किलो
उडीद डाळीचे पीठ ,५० gm पापडखार , मीठ
चवीनुसार ,
७.५ gm पांढरे मिरे ,१२.५ gm
काळे मिरे , हिरवी मिरची चवीनुसार ,
५ gm हिंग ,
१ वाटी तेल .
पोळपाट ,लाटन , ताट , वाटी .
|
अनु .क्रम
|
मालाचे नाव
|
प्रमाण
|
किंमत रु
|
|
१
|
उडीद डाळ
|
१ किलो
|
८०
|
|
२
|
पापड खार
|
४० ग्रॅम
|
५
|
|
३
|
मीठ
|
चवीनुसार
|
-
|
|
४
|
पांढरे मिरे
|
६ ग्रॅम
|
१०
|
|
५
|
काळे मिरे
|
११ ग्रॅम
|
१०
|
|
६
|
हिंग
|
५ ग्रॅम
|
५
|
|
७
|
मिरची
|
चवीनुसार
|
-
|
|
८
|
तेल
|
१ वाटी
|
५
|
एकूण =११५रु
कृती
- उडदाची डाळ दळून आणावी, २ वाटया पीठ बाजूला काढून ठेवावे, ४
वाटया पाणी पातेल्यात घ्यावे त्यात पापडखार व मीठ घालून उकळावे. पाणी गार झाल्यावर
थोडा पापडखार खाली बसेल तो घेऊ नये वरील पाणी घ्यावे. हिरव्या मिरच्यांवर उकळते
पाणी घालून त्या उन्हात वाळवून त्यांचे पांढरे तिखट तयार करावे. मिर्यांची व
हिंगाची पूड करावी.
उडदाच्या डाळीच्या पिठात मिरपूड, हिंगपूड, तिखट घालून पापडखार व
मिठाच्या उकळून गार केलेल्या पाण्याने पीठ घट्ट भिजवावे. पीठ शक्यतो रात्री भिजवून
ठेवावे. दुसर्या दिवशी पाटयाला व वरवंटयाला तेलाचा हात लावून कुटावे. पीठ कुटून
त्याचा मऊ गोळा झाला पाहिजे. पीठ कुटताना अधून मधून पिठाचा गोळा हाताने ताणून लांब
करून परत गोळा करून कुटावा. पिठाचा गोळा मऊ झाला की, तेलाच्या
हाताने सारख्या आकाराच्या लाटया करून झाकून ठेवाव्यात व एक एक लाटी उडदाच्या
डाळीच्या पिठीवर पातळ लाटावी व पापड तयार करावे. तयार झालेले पापड सावलीत वाळवून
डब्यात भरावेत. सर्व पापड झाल्यावर दोन दिवस सावलीत खडखडीत वाळवावेत.
टीप - वरील
पापडाच्या पिठात १ किलो मुगाची डाळ समप्रमाणात घेऊन केलेले उडीद-मुगाचे पापडही
चांगले होतात. पापड भाजून खायचे असतील तर खूप पातळ लाटूनयेत. भाजतांना लवकर जळतो.
प्रत्यक्ष खर्च
|
अनु.क्रम
|
मालचे नाव
|
प्रमाण
|
किंमत रु
|
|
१
|
उडीदडाळ
|
१ किलो
|
८५
|
|
२
|
पापडखार
|
५० ग्राम
|
१०
|
|
३
|
मीठ
|
चवीनुसार
|
२
|
|
४
|
पांढरे मिरे
|
७.५ ग्राम
|
८
|
|
५
|
काळे मिरे
|
१२.५५ ग्राम
|
१०
|
|
६
|
हिंग
|
५ ग्राम
|
५
|
|
७
|
मिरची
|
चवीनुसार
|
-
|
|
८
|
तेल
|
१ वाटी
|
५
|
एकूण खर्च = १२५
फोटो :-
No comments:
Post a Comment